E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
मारक्रम-पूरनमुळे लखनौचा विजय
Wrutuja pandharpure
13 Apr 2025
लखनौ
: आयपीएल २०२५ च्या २६ मॅचमध्ये गुजरातने पहिल्यांदा फलंदाजी करताना १८० धावा केल्या. शुभमन गिल आणि साई सुदर्शनच्या शतकी भागीदारीच्या जोरावर गुजरातने १८० धावांपर्यंत मजल मारली. लखनौकडून एडन मारक्रम आणि निकोलस पूरनसह रिषभ पंत आणि बदोनीनंचांगली फलंदाजी केली. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या मॅचमध्ये लखनौनं बाजी मारली. बदोनीनं लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं, त्यानं २८ धावा केल्या. या पराभवामुळं गुजरात गुणतालिकेत दुसर्या स्थानावर घसरले.
लखनौच्या डावाची सुरुवात एडन मारक्रम आणि रिषभ पंतनं केली. दोघांनी १० च्या धावगतीनं फलंदाजी करत लखनौला चांगली सुरुवात करुन दिली. रिषभ पंत ४ चौकार मारत २१ धावांवर बाद झाला. तर, एडन मारक्रम आणि निकोलस पूरन या दोघांनी अर्थशतकं झळकवली. एडन मारक्रम यानं ९ चौकार आणि १ षटकार मारत ५८ धावांची खेळी केली. निकोलस पूरन यानं फलंदाजीला येताच आक्रमक रुप धारण केलं. पूरन यानं षटकार मारण्यावर लक्ष केंद्रीत केलं.
पूरननं ७ षटकार आणि १ चौकार मारत ६१ धावा केल्या. पूरनला राशिद खान यानं बाद केलं. यानंतर धोकादायक डेव्हिड मिलरला बाद करुन लखनौवर दबाव वाढवण्याची संधी जोस बटलरनं गमावली अन् गुजरातचा संघ आणखी अडचणीत आला.
मात्र, वॉशिंग्टन सुंदरनं मिलरला ७ धावांवर बाद केलं. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी शतकी भागीदारी केल्यानंतर गुजरात २०० धावांचा टप्पा सहज पार करेल, असं वाटत होतं. शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी पहिल्या विकेटसाठी गुजरातला १२० धावांची भागीदारी करुन दिली होती. रिषभ पंतनं आक्रमक झालेल्या शुभमन गिल आणि साई सुदर्शनला रोखण्यासाठी गोलंदाजी आवेश खानवर सोपवली.
आवेश खान यानं अपेक्षेप्रमाणं शुभमन गिलला बाद केलं. गिलनं ३८ बॉलमध्ये १ षटकार आणि ६ चौकारंच्या जोरावर ६० केल्या. शुभमन गिल १३ व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर बाद झाला. यानंतर १४ व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर रवि बिश्नोईनं साई सुदर्शनची विकेट घेतली. इथंच गुजरातच्या हातून मॅच निसटण्यास सुरुवात झाली. साई सुदर्शन यानं १ षटकार आणि ७ चौकारांसह ५६ धावा केल्या.
शुभमन गिल आणि साई सुदर्शन बाद झाल्यानंतर लखनौच्या गोलंदाजांनी कमबॅक केलं. त्यांनी गुजरातला २० ओव्हरमध्ये १८० धावांवर रोखलं. वॉशिंग्टन सुंदर २ धावा तर, जोस बटलर १६ धावा करुन बाद झाला. रुदफोर्ड यां १९ बॉलमध्ये २२ धावा केल्या तर राहुल तेवतिया १ बॉल खेळत शुन्यावर बाद झाला. गुजरातनं २० ओव्हरमध्ये ६ विकेटवर १८० धावा केल्या. लखनौकडून दिग्वेश सिंह यानं ४ ओव्हरमध्ये ३० धावा दिल्या आणि १ विकेट घेतली. शार्दूल ठाकूरनं ४ ओव्हरमध्ये ३४ धावा दिल्या आणि २ विकेट घेतल्या. तर, रवि बिश्नोईनं ४ ओव्हरमध्ये ३६ धावा देत २ विकेट घेतल्या. आवेश खाननं १ विकेट घेतली.
Related
Articles
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमती कमी होणार?
11 Apr 2025
रॉबर्ट वढेरा यांची सलग दुसर्या दिवशी ईडी चौकशी
17 Apr 2025
नाममात्र दरात टीसीएसला आंध्रप्रदेशात जागा
16 Apr 2025
शुल्कवाढीचा भूकंप
13 Apr 2025
मुंढवा चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल
17 Apr 2025
विचारांची पुंजी जपायला हवी
13 Apr 2025
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमती कमी होणार?
11 Apr 2025
रॉबर्ट वढेरा यांची सलग दुसर्या दिवशी ईडी चौकशी
17 Apr 2025
नाममात्र दरात टीसीएसला आंध्रप्रदेशात जागा
16 Apr 2025
शुल्कवाढीचा भूकंप
13 Apr 2025
मुंढवा चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल
17 Apr 2025
विचारांची पुंजी जपायला हवी
13 Apr 2025
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमती कमी होणार?
11 Apr 2025
रॉबर्ट वढेरा यांची सलग दुसर्या दिवशी ईडी चौकशी
17 Apr 2025
नाममात्र दरात टीसीएसला आंध्रप्रदेशात जागा
16 Apr 2025
शुल्कवाढीचा भूकंप
13 Apr 2025
मुंढवा चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल
17 Apr 2025
विचारांची पुंजी जपायला हवी
13 Apr 2025
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमती कमी होणार?
11 Apr 2025
रॉबर्ट वढेरा यांची सलग दुसर्या दिवशी ईडी चौकशी
17 Apr 2025
नाममात्र दरात टीसीएसला आंध्रप्रदेशात जागा
16 Apr 2025
शुल्कवाढीचा भूकंप
13 Apr 2025
मुंढवा चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल
17 Apr 2025
विचारांची पुंजी जपायला हवी
13 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
तहव्वुर राणाला घेऊन NIA पथक दिल्लीत दाखल